MCap of Top 10 Companies : शेअर बाजारातील पडझडीचा फटका केवळ छोट्या गुंतवणूकदारांनाच बसला नाही, तर देशातील दिग्गज कंपन्यांच्या मालमत्तेलाही मोठी गळती लागली आहे. गेल्या आठवड्यात दलाल स्ट्रीटवर आलेल्या मंदीच्या लाटेत भारतातील पहिल्या १० पैकी ९ बड्या कंपन्यांचे बाजारमूल्य तब्बल २,१८,९०२ कोटी रुपयांनी घटले आहे. जागतिक अस्थिरतेचा परिणाम या दिग्गज कंपन्यांच्या समभागांवर स्पष्टपणे दिसून आला.
कोणाला बसला सर्वाधिक फटका?नुकसान सोसणाऱ्या कंपन्यांच्या यादीत टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज कंपनी भारती एअरटेल आघाडीवर आहे.| कंपनीचे नाव | बाजारमूल्यातील घट (₹ कोटी) || भारती एअरटेल | ५५,८५२ || एचडीएफसी बँक | ३७,५८० || रिलायन्स इंडस्ट्रीज | ३४,८४६ || बजाज फायनान्स | २०,३१६ || टीसीएस | १८,१८१ || एलआयसी | १४,९९० || एल अँड टी | १३,७१५ || एसबीआय | १३,०६१ || आयसीआय बँक | १०,३६० |
| कंपनीचे नाव | बाजारमूल्यातील घट (₹ कोटी) |
| भारती एअरटेल | ५५,८५२ |
| एचडीएफसी बँक | ३७,५८० |
| रिलायन्स इंडस्ट्रीज | ३४,८४६ |
| बजाज फायनान्स | २०,३१६ |
| टीसीएस | १८,१८१ |
| एलआयसी | १४,९९० |
| एल अँड टी | १३,७१५ |
| एसबीआय | १३,०६१ |
| आयसीआय बँक | १०,३६० |
(संदर्भ: मागील आठवड्यातील बीएसई आकडेवारी)
मंदीच्या पुरात 'हिंदुस्थान युनिलिव्हर'चा किल्ला शाबूतसर्वच दिग्गज कंपन्यांचे शेअर्स कोसळत असताना, एफएमसीजी क्षेत्रातील हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपनीने मात्र आपली मजबूती दाखवून दिली. या पडझडीच्या काळातही HUL च्या बाजारमूल्यात ५,४६३ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या मागणीमुळे या कंपनीने गुंतवणूकदारांचा विश्वास टिकवून ठेवल्याचे दिसून येते.
रिलायन्स अजूनही 'नंबर वन'इतक्या मोठ्या घसरणीनंतरही बाजारमूल्याच्या बाबतीत आघाडीच्या ३ कंपन्यांच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही.
- रिलायन्स इंडस्ट्रीज: १८.८६ लाख कोटी
- HDFC बँक: १३.६५ लाख कोटी
- स्टेट बँक :११.०९ लाख कोटी
Web Summary : Top 10 companies lost ₹2,18,902 crore in market value. Airtel suffered the most. HUL gained. Reliance still leads.
Web Summary : शीर्ष 10 कंपनियों को बाजार मूल्य में ₹2,18,902 करोड़ का नुकसान हुआ। एयरटेल को सबसे ज्यादा नुकसान। एचयूएल को फायदा। रिलायंस अभी भी आगे।